
Assembly Budget Session: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसकल्प जाहीर केला आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीच्या मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. राज्यात आता शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. (Latest Marathi News)
शिंदे सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा वर्षाव केला आहे. शेतकऱ्यांच्या विम्यासाठी देखील मोठी योजना आणली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा मिळणार आहे.
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून (Farmers) घेतली जात होती. आता शेतकऱ्यांवर कोणताच भार राहणार नाही. त्यामुळे आता राज्य सरकार हप्ता भरणार आहे. यामुळे ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे.
आता राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून राबवली जात होती. मात्र, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना नावाने राज्य सरकारकडून राबविण्यात येईल. त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार आहे. अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्यात येणार आहे. 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीची वाढ करण्यात येणार आहे. 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.