Mumbai : चमचा घेत असल्याने १६ महिन्यांच्या बाळाला जोरदार थोबाडीत मारत दिलं ढकलून, क्रूर घटनेचा VIDEO आला समोर

हट्टी बाळ तरीही चमचा घेण्यासाठी पुढं जातं आणि त्याचवेळी त्याच्या जोरदार थोबाडीत बसते.
Mumbai
MumbaiSaam TV

सिद्धेश म्हात्रे

Mumbai Crime: नवी मुंबईमध्ये वाशी शहरात असलेल्या 'स्मार्ट थॉ ट्स डे' केअर सेंटरमध्ये 16 महिन्याच्या बाळाला थोबाडीत मारून उचलून बाजूला ढकलल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. तसा CCTV व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता याबाबत एनसीआर दाखल केली आहे. सदर घटनेत त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (Latest Mumbai Crime News)

या क्रूर घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. क्रूर महिलेने केलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, 16 महिन्याचा चिमुकला एका खुर्चीवर बसला आहे. तेवढ्यात एक महिला टेबलावर त्याच्या समोर जेवणाचे ताट ठेवते. बाळाला त्या ताटात असलेला चमचा घ्यायचा असतो.

Mumbai
Pune Crime : पुण्यात चाललंय काय? कोयता गँगचा काँग्रेसच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात जीव वाचला

त्यामुळे महिला ते ताट थोडं पूढं सरकवते. हट्टी बाळ तरीही चमचा घेण्यासाठी पुढं जातं आणि त्याचवेळी त्याच्या जोरदार थोबाडीत बसते. महिला त्याला उचलून बाजूला ढकलते. जोरदार चापट बल्यानं बाळ जोरजोराद रडू लागतं. त्याचे रडण्याचे हुंदके थांबता थांबत नाहीत. या घटनेची बाळाने इतकी धास्ती घेतली असते की, ते घरी गेल्यावर देखीव रडतं असतं.

Mumbai
Mumbai Crime : आयआयटीतील विद्यार्थ्याला बनवलं 'लैंगिक गुलाम'; तंत्रविद्येचा वापर करून केला सामूहिक अत्याचार

घरी आल्यावर देखील बाळाचं रडणं थांबत नसल्याने cctv चेक केल्यावर हा प्रकार समोर आलाय. दोन आठवड्यांपासून हे बाळ रात्री झोपत नाही, सतत रडत असल्याने या बाळाला या आधी देखील पाळणा घरातून अशी मारहाण केली असणार असा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी फक्त एनसीआर दाखल केली असल्याने, या पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्ही देखील चेक करता आले नाहीत. पाळणाघर चालकाने पालकांनी तक्रार केल्यावर त्यांचं सीसीटीव्ही आणि मोबाइलचं कनेक्शन बंद केलं आहे. यामुळे याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यास या प्रकरणाच्या पूर्ण चौकशी अंती अजून काही व्हिडिओ समोर आले असते अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com