Crypto Currencyचा गुन्हा! रश्मी शुक्लांच्या जवळच्या Cyber Expertला अटक तर माजी IPS...

क्रिप्टो करन्सी बिटकॉईनच्या गुन्ह्यात पुणे सायबर पोलिसांनी एका माजी आय पी एस अधिकारी (IPS Officer) आणि एका पोलीसाच्याच सायबर एक्सपर्टला (Cyber Expert) अटक केली आहे.
Crypto Currencyचा गुन्हा! रश्मी शुक्लांच्या जवळच्या Cyber Expertला अटक तर माजी IPS...
Crypto Currencyगोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: क्रिप्टो करन्सी बिटकॉईनच्या गुन्ह्यात पुणे सायबर पोलिसांनी एका माजी आय पी एस अधिकारी (IPS Officer) आणि एका पोलीसाच्याच सायबर एक्सपर्टला (Cyber Expert) अटक केली आहे. रविकांत पाटिल असं माजी आय पी एस पोलिस अधिकाऱ्याचं नाव आहे. तर पंकज घोडे अस सायबर एक्स्पर्टच नाव आहे.

Crypto Currency
Photos: डीप नेक ड्रेस... मधील भूमी पेडणेकरच्या अदा

२०१८ मध्ये दाखल असलेल्या क्रिप्टो करन्सी गुन्ह्यात पाटिल आणि घोडे यांना अटक करण्यात आली आहेत. रविकांत पाटिल हे जम्मू कश्मीर कॅडरचे माजी आय पी एस अधिकारी आहेत. तर पंकज घोडे हे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मि शुक्ला यांच्या जवळचे सायबर एक्सपर्ट आहेत. २०१८ मध्ये पुण्यातील दत्तवाडी पोलीसात बिटकॉईन संबंधित एक गुन्हा दाखल आहे. त्या तपासात सुरुवातीला पोलिसांनी सायबर एक्सपर्ट पंकज घोडे याची मदत घेतली होती. मात्र पंकज घोडे यांनी तपासादरम्यान पोलीसाच्या खात्यात पैसे वळविण्याऐवजी स्वतःच्या खात्यात पैसे वळविल्याचे पोलीस तापसात उघडकीस आले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर पोलिसानी संबधित तापस रविकांत पाटिलकडे दिला. मात्र त्यांनी देखील बिटकॉइनचे पैसे पोलीसाच्या खात्यात पैसे वळविन्याऐवजी स्वतःच्याच खात्यात पैसे वळविल्याचे पोलीस तापसात उघडकीस आल आहे. ही बाब राज्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे ए डी जी प्रभात कुमार याच्या निदर्शनात आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रविकांत पाटिल आणि पंकज घोडे यांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com