Breaking : मुंबईतील जुहू बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीलाही फाशीची शिक्षा

जुहू परिसरामध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
court order
court ordersaam tv

मुंबई : साकिनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार करुन त्या महिलेची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi session court) काल झालेल्या सुनावणीत फाशीची शिक्षा सुनावली. त्यापाठोपाठच आता दिंडोशी सत्र न्यायालयाने जुहू बलात्कार (juhu rape case) आणि हत्या प्रकरणातही महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र (३५) याला मृत्यूदंडाची शिक्षा (Sentenced to death) सुनावण्यात आलीय. २०१७ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वड्डीला अटक केली होती.

court order
'बारीक व्हा...थोडं बारीक व्हा..'; रोखठोक अजित पवारांनी पोलीस उपायुक्ताला दिला फिटनेसचा सल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ मध्ये जुहू परिसरामध्ये एका सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात परिसरातील वड्डी ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. वड्डी याने सन २०१७ मध्ये लैगिंक अत्याचार केला होता आणि याप्रकरणात तो जामिनावर बाहेर होता.

मात्र, पोलिसांच्या चौकशीमध्ये वड्डी उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तो मुलीसोबत दिसल्याने पोलिसांनी वड्डीला पोलीसी खाक्या दाखवल्या. त्यानंतर अखेर वड्डीने गुन्ह्याची कबुली दिली. या गंभीर घटनेमुळं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तसेच नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळल्याने संतप्त नागरिकांनी जुहू पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com