लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत : सायरस पुनावाला

केंद्र सरकारला लस न मिळाल्याने त्यांनी आम्हाला दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे
लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत : सायरस पुनावाला
लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत : सायरस पुनावालाSaam tv news

जगात कोणतीही एक कंपनी महिन्याला दहा कोटी लसींचं उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत. आम्ही प्रॅाफिट मध्ये तोटा सहन करतोय. तसचं मिक्स डोस देण्यास माझा विरोध आहे, असल्याचे मत सीरमचे इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. (Politicians are slapping the number of vaccinations: Cyrus Punawala)

हे देखील पहा -

यावेळी बोलताना सायरस पुनावाला यांनी देशभरातील कोविड परिस्थितीवर आणि लसींच्या उत्पादनावर आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कॉकटेल लसीबाबतही आपले मत व्यक्त केले, मी कॉकटेल लस देण्याच्या विरोधात आहे. लसींच्या मिक्सिंगची गरज नाही. लसींचे मिक्सिंग केल्यास परिणाम चांगला निघाला नाही तर एकमेकांना दोष दिले जातील. सीरम म्हणेल समोरच्या कंपनीची लस चांगली नाही. तर समोरची कंपनी म्हणेल सीरमच्या लसीमुळे परिणाम चांगले आले नाहीत. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांशिवाय काहीही होणार नाही.

लस देण्याच्या आकड्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत : सायरस पुनावाला
डोंबिवलीनंतर 14 गावच्या नदीत झाले हिरवेगार पाणी

अमेरिकेत अजूनही कोरोनाची लाट कमी झालेली नाही. कोरोना इतक्यात जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण केंद्र सरकारला लस न मिळाल्याने त्यांनी आम्हाला दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्ही नफ्यात तोटा सहन करतो. आपल्याला लस मिळावी, असे सर्वांना वाटते,पण ते शक्य नाही. मला लस विकून पैसे कमवायचे नाहीत पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी आहे, पण लोक उशीरा उपचार घेण्यासाठी येतात, लोकांच्या निष्काळजीपणामुळे जास्त मृत्यू होत आहेत. असा गंभीर आरोपही सायरस पुनावाला यांनी यावेळी केला. तसंच 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होत असल्याने तिसरा डोस किंवा बुस्टर डोस घेणेही आवश्यक आहे. तिसरी लाट जास्त गंभीर नसेल, असंही सायरस पुनावाला यांनी म्हटलं.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com