Dahi Handi Celebrations: उंच मानवी मनोरे कोसळल्याने आतापर्यंत ३५ गोविंदा जखमी; BMC हॉस्पिटलमध्ये १२५ खाटा तयार

Dahi Handi celebrations 35 Govinda Injured: जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी महापालिका देखील सतर्क आहे. पालिकेने शहरातील रुग्णालयातील १२५ खाटा राखीव ठेवल्यात.
Dahi Handi celebrations
Dahi Handi celebrationsSaam TV

BMC Keeps 125 Beds:

दहीहंडीच्या उत्सवात उंचच्याउंच मनोरे रचणारे गोविंदा आपल्या जिवाची पर्वा न करता दहीहंडी फोडतात. या दहीहंडीच्या खेळाला सहासी खेळ म्हटलं जातं. यामध्ये दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. मात्र तरी देखील पुढल्यावर्षी त्याच जोमाने दहीहंडी फोडण्यासाठी उभे राहतात. आज देखील सकाळपासून आतापर्यंत एकूण ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

३५ गोविंदा जखमी झाल्याने यातील ४ गोविंदा रूग्णालयात भरती तर ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यासह २२ गोविंदा ओपीडीमध्ये उपचार घेत आहेत. गोविंदाना या सहासी खेळात कोणतीही दुखापत झाल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सोई शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व गोविंदांना विमा कवच देखील देण्यात आलं आहे.

Dahi Handi celebrations
Gopalkala Recipe: यंदा दहीहंडीला घरच्या घरी बनवा गोपाळकाला

जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी महापालिका देखील सतर्क आहे. पालिकेने शहरातील रुग्णालयातील १२५ खाटा राखीव ठेवल्यात. सायन रुग्णालयात १० खाटा, केईएममध्ये ७, नायर रुग्णालयात ४ आणि उर्वरित शहरांमध्ये तसेच मुंबईच्या उपनगरांमधील रुग्णालयात खाटा ठेवण्यात आल्यात.

गोविंदाच्या साहसी खेळामध्ये ९ ते १० थर रचले जातात. हे थर रचून दहीहंडी फोडली जाते. शहरांमध्ये चौकाचौकात राजकीय नेतेमंडळींकडून देखील मानाच्या दहीहंडी बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी हजारो आणि लाखोंचे बक्षिस ठेवले जाते. गोविंदांच्या मनोरंजनासाठी कलाकार मंडळी देखील उपस्थित राहतात. अशा आनंदी सनाच्या दिवशी गोविंदांना दुखापत झाल्यास तातडीने उपचार मिळावा म्हणून बीएमसी हस्पिटलमध्ये १२५ खाटा तयार ठेवण्यात आल्यात.

Dahi Handi celebrations
Thane Eknath Shinde Dahihandi | ठाण्यात दहीहंडीचा उत्साह, गोविंदांची सुरक्षेसाठी प्रयत्न

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com