Dahi Handi 2023: राज्यभरात दहीहंडीच्या थरांचा थरार; मुंबईत १०७, तर ठाण्यात १७ गोविंदा जखमी

Mumbai Dahi Handi 2023: राज्यात गुरूवारी (७ सप्टेंबर) दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
Mumbai Dahi Handi 2023
Mumbai Dahi Handi 2023Saam TV

Maharashtra Dahi Handi 2023: राज्यात गुरूवारी (७ सप्टेंबर) दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी गोविंदा पथकांनी थरावर थर लावत सलामी दिली. मुंबईसह ठाणे आणि पुणे शहरातही दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

दरम्यान, या उत्सवाला काही ठिकाणी गालबोटही लागल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत दहीहंडी उत्सवात रात्री ९ वाजेपर्यंत तब्बल १०७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Mumbai Dahi Handi 2023
Maratha Reservation: सरकारकडून निरोप आल्यानंतरच मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवणार: मनोज जरांगे पाटील

यातील १४ गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर ६२ गोविंदाना प्राथामिक उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे. अजून ३१ जणांवर उपचार सुरू असल्याचं कळतंय. दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेला आकडा हा गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंतचा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे ठाण्यातील दहीहंडी उत्सवात (Dahi Handi 2023) १७ गोविंदा जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. यातील काही गोविंदांच्या पायाला, हाताला तर कमरेला काही प्रमाणात दुखापत झाल्याची माहिती आहे.

Mumbai Dahi Handi 2023
India vs Pakistan Match: पावसाने खोडा घातला तर पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये; टीम इंडियाचं काय होणार?

त्यांच्यावर कळवा आणि सिव्हील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे यातील कोणत्याही गोविंदाना गंभीर दुखापत झालेली नाही. प्राथामिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

बुलढाण्यात भिंत कोसळून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, ९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे ही घटना घडली आहे. निदा रशीद खान पठाण असे मृत मुलीचे नाव आहे तर अल्फिया शेख हफीज हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com