Mumbai Crime : दहिसर पोलिसांचे "मिशन अलीबाबा" सक्सेस, तिघांना उत्तर प्रदेशातून अटक

दोन सराईत चोरांसोबत चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून अटक
Mumabi Crime News
Mumabi Crime NewsSaam Tv

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईच्या दहिसर पोलिसांनी (Mumbai Police) एका चोरीच्या गुन्ह्यात तब्बल वर्षापासून फरार असणाऱ्या दोन आरोपींसह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तीस "मिशन अलीबाबा" मोहिमे अंतर्गत उत्तर प्रदेश मधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे सलमान अंसारी आणि हैदरअली सैफी असून चोरीचे दागिने खरेदी करणारा खुशाल वर्मा हे सर्व उत्तर प्रदेशाचे (Uttar Pradesh) रहिवाशी आहे. पोलिसांनी (Police) या दोघांकडून तब्बल 18 लाख 7 हजार किंमतीचे सोन्याचे तुकडे देखील हस्तगत केले आहे.

Mumabi Crime News
Kolhapur News: ऊस दर आंदोलनाला कोल्हापुरात हिंसक वळण; अज्ञातांनी ऊस वाहतूकीचा ट्रॅक्टर पेटवला

एक वर्षभरापूर्वी दहिसर पूर्वेकडील चुनाभट्टी सचिन नगर परिसरातील एका फ्लॅटमधून 933 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रुपये चोरी गेल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी चोरांना पकडण्यासाठी दहिसर पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर तब्बल 167 सीसीटीव्ही फुटेज आणि 97 सिम कार्ड यांची पडताळणी केल्यानंतर चोरांचा सुगावा लागला.

याच तांत्रिक माहितीच्या आधारावर दहिसर पोलिसांची एक टीम चोर राहत असलेल्या उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नोएडा भागात गेली. चोरांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी पोस्टमन, पान टपरीवाला यासारखी अनेक वेशांतर करून चोरांची इत्यंभूत माहिती गोळा केली. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने दोन्ही चोरांना आणि चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या खुशाल वर्मा नावाच्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतले.

या चोरी प्रकरणातील दोन्हीही आरोपी हे सराईत चोर असून एका आरोपीच्या नावावर 37 सिम कार्ड तर दुसऱ्या आरोपीच्या नावावर साठ सिमकार्ड रजिस्टर होते. हे चोर जेव्हा मोबाईल मध्ये सिम कार्ड वापरत होते तेव्हा ट्रू कॉलर वरती त्यांचे नाव अलीबाबा असे दिसत असल्यामुळे यांना पकडण्यासाठी मिशन आलीबाबा मोहीम आखण्यात आली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com