रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशी माहिती रायगड पाटबंधारे विभागाने दिली आहे.

राजेश भोस्तेकर

रायगड जिल्ह्यात (Raigad District) गेल्या तीन दिवसापासून पावसाने रायगडाला चांगलेच झोडपून काढले आहे. मुरुड, श्रीवर्धन, रोहा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 14 जुलै पर्यत जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशी माहिती रायगड पाटबंधारे विभागाने दिली आहे.

त्यानुसार सखल भागातील, नदी किनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. आपत्कालीन प्रसंगी स्थानिक प्रशासनाला संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

रायगडातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

रायगड जिल्ह्यात 10 जुलैपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार पावसाने 11 जुलै पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आणि जिल्ह्याची दाणादाण उडाली. पावसाचा सर्वाधिक फटका हा मुरुड तालुक्याला बसला असून काशीद येथे पूल वाहून गेला, दरड कोसळली, उसरोली नदीला पूर आल्याने परिसरातील गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्रशासनाने बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविले आहे. मुरुड तालुक्यात साडेतीनशे मिलिमीटर पाऊस 12 जुलै रोजी पडला आहे. जिल्ह्यातील रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव या तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला आहे.

जिल्ह्यात तीन दिवस पाऊस पडत असल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका, नागोठण्याची अंबा तर महाडच्या सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 14 जुलै पर्यत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. मुसळधार पावसाने अनेक गावाचा संपर्कही तुटला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com