जिंतूर शहरात पुन्हा धाडसी चोरी; सव्वा आठ लाख रुपयांचा माल लंपास

घरात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी केली चोरी
जिंतूर शहरात पुन्हा धाडसी चोरी; सव्वा आठ लाख रुपयांचा माल लंपास
जिंतूर शहरात पुन्हा धाडसी चोरी; सव्वा आठ लाख रुपयांचा माल लंपासSaam Tv

जिंतूर - शहरातील गणपती गल्ली येथील एका घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी Theft घरातील ५ लाख रुपये रोकड आणि इतर सोन्याचे दागिने Gold असा सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना काल दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

हे देखील पहा -

सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद काळे आणि त्यांचा मुलागा बालाजी प्रल्हाद काळे हे दोघे गणपती गल्ली येथे राहतात. मुलाच्या शिक्षणासाठी हे दोघेही औरंगाबादला गेले होते. तर त्यांचे आईवडील उपचारासाठी नांदेड येथे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले ५ लाख रुपये नगदी, दोन तोळ्याची सोन्याची चैन ,सोन्याच्या अंगठ्या, कानातील चैन, झुंबर, चांदीचे भांडे व घरातील २५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही या अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. असे एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा माल या चोरट्यांनी लंपास केला आहे.

जिंतूर शहरात पुन्हा धाडसी चोरी; सव्वा आठ लाख रुपयांचा माल लंपास
चोरांचा हैदोस, एकाच इमारतीत तीन फ्लॅट फोडले

सकाळी घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजारी राहत असलेल्या रमेश कडे यांनी बालाजी काळे यांना फोनवरून सांगितले. घटनास्थळावर पोलिसांनी येऊन पाहणी देखील केली. तसेच परभणी येथून श्वानपथकला पाचारण करण्यात आले. श्वानपथकने घरापासून काही अंतरावर मार्ग दाखवला. परंतु त्यानंतर चोरटे वाहनाने पसार झाले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी शहरात झालेल्या चोरीच्या अनेक घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसताना या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com