MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video

मुख्यमंत्र्यांची सही होऊनही नियुक्त्या रखडलेल्या आहेत.
MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video
MPSC च्या 416 जागांच्या नियुक्त्या तातडीने होणार, आज बैठक; पाहा Video Saam TV

पुणे; गेल्या अनेक दिवसांपासून MPSC ची भरती प्रकिया रखडलेली आहे. स्वप्नील लोणकर नावाच्या उमेदवारानं आत्महत्या केल्यानंतर राज्यात सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यानंतर लवकरात लवकर भरती करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विधीमंडळात बोलताना दिलं होतं, परंतु अजूनही भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आज राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी साम टीव्हीशी बोलताना MPSC च्या रखडलेल्या 416 नियुक्त्या तातडीने होणार असल्याची माहिती दिली त्याचबरोबर आज याबाबत बैठक देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांची सही होऊनही नियुक्त्या रखडलेल्या आहेत.

7 हजार पदांचं मागणीपत्र आलं आहे. त्यासाठी नियुक्ती प्रक्रिया पुढच्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती दत्ता भरणे यांनी दिली. उरलेल्या 15 हजाराची किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्यासाठी ही पाठपुरावा सुरु असल्याची माहिती दत्ता भरणे यांनी दिली आहे. कोरोनामुळे परिक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांच्या मुदतवाढीचा मुद्दा त्यासाठीचे आदेश काढण्यात आचारसंहितेची अडचण येत आहे, त्याचबरोबर निवडणुक आयोगाची परवानगी घेऊन आदेश काढणार आहे. मात्र विद्यार्थी परिक्षेला मुकणार नाहीत याची दक्षता घेऊ असेही भरणे म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com