Daud Ibrahim च्या हस्तकाला अटक

अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी माझगाव परिसरात आला असताना केली अटक
Daud Ibrahim च्या हस्तकाला अटक
Daud Ibrahim च्या हस्तकाला अटक Saam tv

सुरज सावंत

केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने (Central Narcotics Department) कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) हस्तकाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. एनसीबीने (NCB) त्याच्याकडून १० लाखा़चे ड्रग्ज जप्त केले आहे. माझगावच्या रेरोड परिसरात आरोपी मोहम्मद आरिफ (Mohmmad Aarif) हा ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. सापळा रचून एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.

हे देखील पहा-

एनसीबी, मुंबईचे म्हणणे आहे की, त्याने काल रेय रोडवरून अवैध बाजारात 10 लाख रुपये किमतीच्या एमडी औषधासह मोहम्मद आरिफ या औषध विक्रेत्याला अटक केली. मोहम्मद आरिफ हा दाऊद इब्राहिमचा सहकारी चिंकू पठाणशी संबंधित ड्रग्स प्रकरणातील 3 गुन्ह्यात फरार होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com