नितेश राणेंच्या विरोधात दौंड युवासेनेचं अनोखं आंदोलन

नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कुत्र्याच्या गळ्यात नितेश राणे यांच्या नावाच्या पाटी अडकवण्यात आली होती.
नितेश राणेंच्या विरोधात दौंड युवासेनेचं अनोखं आंदोलन
नितेश राणे यांच्या विरोधात दौंड युवासेनेचं अनोखं आंदोलनमंगेश कचरे

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackerey) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दौंड युवासेना जोरदार आक्रमक झाली. आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी युवासैनिक, शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कुत्र्याच्या गळ्यात नितेश राणे यांच्या नावाच्या पाटी अडकवण्यात आली होती.

राज्यात सध्या गलिच्छ राजकारण केले जात असून वेळोवेळी राणे कुटुंबीय हे शिवसेनेवर आरोप करून शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी अधिवेशानाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com