Daya Nayak : गुंडांना धडकी भरणार! एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्ती

Mumbai Police : राज्य पोलीस दलात करण्यात आलेल्या बदल्यांची यादी जारी करण्यात आली आहे. यात दया नायक याच्यासह तीन पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.
Daya Nayak In Mumbai Police
Daya Nayak In Mumbai Policesaam tv

Daya Nayak In Mumbai Police : एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसांत (Mumbai Police) दिसणार आहेत. राज्य पोलीस दलात करण्यात आलेल्या बदल्यांची यादी जारी करण्यात आली आहे. यात दया नायक याच्यासह तीन पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.

दया नायक हे सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात (Maharashtra ATS) कार्यरत आहेत. त्यांच्यासह चंदन चौकी येथे तैनात दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) असलेले दौलत साळवे आणि ज्ञानेश्वर वाघ यांची देखील मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे. त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Daya Nayak In Mumbai Police
Accident News: रात्रीच्या अंधारात जीपने 8 जणांना चिरडले, भीषण अपघातात दोन चिमुकल्यासह 5 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

याशिवाय मुंबई पोलीस दलातील कैलास बोंद्रे, अशोक उगले आणि रमेश यादव या तीन निरीक्षकांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 2021 मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर दया नायक यांची एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती.

मात्र त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) मुंबईने नायक यांच्या गोंदिया येथे बदलीला स्थगिती दिली होती. MAT चे सदस्य ए पी कुर्‍हेकर यांनी नायक यांना एटीएसच्या जुहू युनिटमध्ये पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.

कोण आहेत दया नायक?

मुंबई पोलीस दलात दया नायक यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख आहे. दया नायक यांची 1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यासोबत गु्न्हे अन्वेषण शाखेत काम केले. शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात त्यांचा समावेश होता. दया नायक यांनी जवळपास 80 गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.

Daya Nayak In Mumbai Police
Horoscope Today : 'या' लोकांनी भावनांवर कंट्रोल ठेवा, अन्यथा वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता

वादग्रस्त कारकिर्द

दरम्यान बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना 2006 साली पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ACB ने त्यांना अटक केली होती. परंतु त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न मिळाल्याने त्यांना क्लिन चीट मिळाली.

त्यानंतर 2012 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली होती, परंतु तिथे ते रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर 2016 मध्ये ही निलंबनाची कारवाई मागे घेऊन पुन्हा मुंबई पोलिस दलात त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com