12 BJP MLA's Suspension: भाजपच्या १२ निलंबित आमदारांचा आज होणार फैसला

12 BJP MLA's Suspension Case: येत्या ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यापूर्वी निलंबन मागे घेतलं जाणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
12 BJP MLA's Suspension Case
12 BJP MLA's Suspension CaseSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी आज दुपारी दोन वाजता विधान भवनात निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. भाजप आमदारांनी निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज केल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांकडून दखल घेण्यात आली असून आज दुपारी दोन वाजता निलंबनाबाबत पुनर्विचार होणार आहे. भाजप आमदार (BJP MLA's) आशिष शेलार (Ashish Shelar) विधानभवनात उपस्थित राहणार आहेत. (Decision of 12 suspended BJP MLAs will be taken today)

हे देखील पहा -

येत्या ११ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्यापूर्वी निलंबन मागे घेतलं जाणार का? असा सवाल उपस्थित होतोय. भाजपच्या १२ आमदारांना पावसाळी अधिवेशनात निलंबित (Suspended) करण्यात आले होते. यात आशिष शेलार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, योगेश सागर, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

अतुल भातखळकर राहणार अनुपस्थित:

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधीमंडळ सचिव यांना पत्र लिहित आजच्या सुनावणीला उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे. कोरोना झाल्याने आजच्या सुनावणीला उपस्थितीत राहणार नाही असं त्यांनी कळवलं आहे. भातखळकर यांच्यासह गिरीश महाजन, राम सातपुते यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे आजच्या सुनावणीला तेदेखील उपस्थित राहणार नाहीत.

12 BJP MLA's Suspension Case
खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा; नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना

सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०२१ रोजी विधीमंडळास नोटीस जारी केली होती. निलंबित आमदार याबाबत अर्ज करूनही अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर कालावधीत काहीच निर्णय घेतला गेला नाही. आता उपाध्यक्ष यांना अध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज असल्याने थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही यामुळे आता लेखी उत्तर तुर्तास विधीमंडळ सचिव यांना कळवत असल्याचे भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. निलंबित आमदार आशिष शेलार मात्र आज सुनावणीसाठी जाणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com