
Mumbai News: केंद्र सरकारच्या (Central Government) अध्यादेशाला विरोध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'मोदी सरकारला (Modi Government) खूप अहंकार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला खूप अहंकार झाला. तर ती व्यक्ती स्वार्थी होते. स्वार्थ आणि अहंकारासोबत जगणारी अशी व्यक्ती कधीच देश चालवू शकत नाही.', अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, 'दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारासाठी आठ वर्षे खूप मोठी लढाई लढली आहे. दिल्लीमध्ये आमचे सरकार 2015 मध्ये स्थापन झाले. आमचं सरकार आल्यानंतर आमची सर्व शक्ती केंद्र सरकारने काढून घेतली. एक छोटा अध्यादेश जारी करत मोदी सरकारने आमची सर्व शक्ती काढून घेतली. पण सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आठ दिवसांत केंद्र सरकारने नवीन अध्यादेश काढत आमची सर्व शक्ती काढून घेतली. कोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकारचा हा अध्यादेश आहे.'
'याची लोकं म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टाला मानत नाही. याच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजला शिव्या दिल्या आहेत. त्यांची लोकं जजच्या विरोधात आणि कोर्टाच्याविरोधात सोशल मीडियावर कॅपेन चालवतात. रिटायर जजला ते अँटी-नॅशनलिस्ट म्हणतात. त्यांनी आता एक मॅसेज दिला आहे की सुप्रीम कोर्टाने काहीही निर्णय देऊ द्या आम्ही तो मानत नाही. असं केलं तर देश कसं चालेल.', असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, 'शिवसेनेने हे भोगलं आहे. बहुमताने निवडून आलेल्या आणि जनतेने निवडून दिलेल्या शिवसेनेच्या सरकारला यांनी पैसे देऊन आणि सीबीआयच्या धाडी टाकून पाडलं. एखाद्या राज्यात भाजपचे सरकार तयार झाले नाही तर ते आमदार खरेदी करुन सरकार पाडतात. नाही तर सीबीआय आणि ईडीचा धाक दाखवून आमदारांना तोडून सरकार पाडतात. दिल्लीमध्ये त्यांनी ऑपेरेशन लोटस केल पण ते अपयशी झाले. आमचे देखील आमदार त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला पण तसे झाले नाही. आमचे सरकार पडत नाही तेव्हा त्यांनी अध्यादेश काढून आमचे अधिकार काढून घेतले.', अशी टीका देखील त्यांनी केली
अरविंद केजरीवाल यांनी यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'मोदी सरकारला खूप अहंकार झाला आहे. एखाद्या व्यक्तीला खूप अहंकार झाला तर ती व्यक्ती स्वार्थी होते. स्वार्थ आणि अहंकारासोबत जगणारी अशी व्यक्ती देश चालवू शकत नाही. ते देशाबद्दल विचार करत नाहीत. हा अहंकाराचा परिणाम आहे. अहंकारामुळे काहीच वाचत नाही. ही लढाई फक्त दिल्लीची नाही तर संपूर्ण देशाची आहे. ही लढाई संविधान आणि लोकशाहीची आहे.' असे त्यांनी सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.