
निवृत्ती बाबर
Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर आज अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. '२०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार येणार नाही, असं भाकीत अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. (Latest Marathi News)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'शरद पवार आणि इतर सदस्यांचे आभार मानतो. दिल्लीच्या लोकांसमोर अन्याय होत आहे. २०१५ ला एक नोटिफिकेशन जारी करून अधिकाऱ्यांवरील ताकद काढून घेतली. गेली आठ वर्ष आम्ही कोर्टात लढत होतो. 5-0 ने आम्ही यामध्ये जिंकलो'.
' संसदेत बिल स्वरूपात आलं, तेव्हा आम्ही सर्व नेत्यांची भेट घेत आहोत. हे बिल येईल, तेव्हा त्याला विरोध केला पाहिजे. तेव्हा शरद पवार यांचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. ही केवळ दिल्लीची लढाई नाही, देशाची लढाई आहे, असे केजरीवाल म्हणाले.
'जिथे भारतीय जनता पार्टी हारते, तिथे तीन शक्ती भाजप लावत आहे. आमदारांना खरेदी केली जात आहे. केंद्रीय यंत्रणा मागे लावल्या जात आहेत. अध्यादेश आणून अधिकार काढले जातात, असेही केजरीवाल पुढे म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणाले, ' शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांना विनंती करतो की इतर पक्षांना देखील सांगावं. आता जर हे बिल पास झालं तर ही सेमी-फायनल असेल'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.