Pune Crime News : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा घरात घुसून विनयभंग, खडकी परिसरातील संतापजनक प्रकार

Khadaki Police News : मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला.
Khadki Police
Khadki PoliceSaam TV

सचिन जाधव

Pune News :

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉय आपल्या घरी येणे ही खूप सामन्य बाब आहे. परंतु पुण्यातील एका तरुणीला एका भयानक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला. त्यानंतर त्याने फिर्यादीकडे शरीर सुखाची मागणी केली. वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला. तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन शॉपिंग साईटच्या डिलिव्हरी बॉयविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

Khadki Police
Raigad News: शालेय क्रीडा स्पर्धेत स्पर्धकानं फेकलेला भाला डोक्यात घुसला; विद्यार्थ्याचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने ऑनलाईन शॉपिंग साईटवरून घरगुती सामान मागवले होते. ते सामान आल्यानंतर चेक करत असताना त्यात सॅनिटरी पॅडची पॅकिंग फोडल्याचे आढळून आले. दरम्यान त्यांनी ऑनलाईन शॉपिंग साईटला मोबाईलवरून फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला.

त्यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने पैशाची मागणी केली असता तरुणीने ऑनलाईन शॉपिंग साईटशी बोलून घ्या असे त्याला सांगितले.  (Latest Marathi News)

Khadki Police
Mumbai TB Hospital : मुंबईतील शिवडी टीबी हॉस्पिटलचा बालरोग विभाग सुरू, आशियातील सर्वात मोठं रुग्णालय

त्यावर डिलिव्हरी बॉयने तुम सेक्स करोगी क्या? अशी विचारणा तरुणीला केली. तसेच अश्लील हावभाव करत मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या निमित्ताने घरात येऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com