"अनंत करमुसेंना न्याय मिळाला आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये"

"मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक, प्रताप सरनाईक...रांगेमध्ये वाट पाहत आहेत"

"अनंत करमुसेंना न्याय मिळाला आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये"
"अनंत करमुसेंना न्याय मिळाला आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये"SaamTV

मुंबई : सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना जामीन मंजूर करुन त्यांची सुटका केली असल्याची माहिती काल समोर आली. या अटकेबाबत भाजपा नेते किरीट सोमय्यांनी स्वत: ट्विट केले होते. दीड वर्षानंतर शेवटी न्यायालयाने न्याय दिला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आव्हाडांना अटक केली. अनंत करमुसेंना न्याय मिळाला आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये आम्ही राज्यपालांकडे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याची माहीती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. (Demand for removal of Jitendra Awhad from the Cabinet)

"मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक, विवेक पाटील तुरुंगात आहे, अनिल देशमुख, अनिल परब, आनंद अडसूळ, भावना गवळी, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक ....... रांगेत QUE मध्ये वाट पाहत आहेत" असे ट्विट काल किरीट सोमय्यांनी केले होते.


"अनंत करमुसेंना न्याय मिळाला आता अशा गुंड मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ठेवू नये"
याबाबतीत पाकिस्तान देखील भारताच्या पुढे; हे तर मोदी सरकारचे अपयश - सचिन सावंत

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर मारहाण केलेल्या अनंत करमुसे यांच्या समवेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांची आज भेट घेतली तसेच जितेंद्र आव्हाड याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सरकार जोरदार टीका केली. सदरचा गुन्ह्यातील कलम मान्य नसल्याचे देखील त्यांचे वकील अनिरुद्ध गानू यांनी माहिती दिली. सदरचा कलमांच्या बाबतीत तपासणी केली असल्याचे अनंत करमुसे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com