संतापजनक: दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्ती
संतापजनक: दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्तीSaam Tv

संतापजनक: दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्ती

विठ्ठल चौकामध्ये बांधलेल्या वारकऱ्यांच्या पुतळ्याची २ दिवसांपूर्वी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली

मुंबई : मुंबई मधील दहिसर पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराजवळ एक संतापजनक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या विठ्ठल चौकामध्ये बांधलेल्या वारकऱ्यांच्या पुतळ्याची २ दिवसांपूर्वी मध्यरात्री तोडफोड करण्यात आली होती. यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होत होता. या घटनेमुळे परिसरातील अनेकांना प्रश्न पडला होता की, कुणी असे का केले असेल किंवा तोडफोड करणाऱ्यांनी हे करुन काय साध्य करणार असेल. या घटनेबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत असताना अखेर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकले आहेत.

हे देखील पहा-

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये एका स्कुटीवर आलेले तिघांपैकी दोघेजण खाली उतरुन या शिल्पाची विटंबना करत असताना आढळून आले आहेत. हे शिल्प उभारण्यात आले आहेत. त्या चौकामध्ये स्कुटी ही स्कूटी थांबल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर मागच्या बाजूस बसलेली व्यक्ती स्कुटीवरुन उतरताना दिसून आली आहे.

या व्यक्ती बरोबर असणारे इतर दोघेजण शिल्पाची विटंबना करत असताना दिसून आले आहे. यामध्ये एकजण शिल्पामधील वारकऱ्याची मुर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपासास सुरूवात केले. तपासादरम्यान यामध्ये आरोपी मुंबई मधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

संतापजनक: दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्ती
Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)

यानंतर सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विघ्नेश हेगडे (वय-३०), अमर चित्तोरिया (वय-२५), संजय गारू (वय-३०) यांना बोरीवली या ठिकाणाहुन अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींनी नशेच्या अवस्थेत असतांना शिल्प तोडल्याची माहिती दिली आहे. सदर तिन्ही आरोपी दहिसर येथील रहिवासी आहेत. या आरोपींपैकी अमर चित्तोरिया याच्याविरुद्ध याअगोदर देखील २ गुन्हे दाखल झाले आहेत. एमएचबी पोलिसांनी या ३ आरोपींना ४८ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.