Neelam Gorhe : केंद्रीय मंत्री राणे यांच्या भाषणावर नीलम गोऱ्हे यांनी घेतला आक्षेप; विधानभवनात नेमकं काय घडलं?

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणावर आक्षेप घेतला.
Neelam Gorhe News
Neelam Gorhe News Saam tv

Neelam Gorhe News : विधानभवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्राचे अनावर करण्यात येत आहे. या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या औचित्यभंग भाषणावर आक्षेप घेतला. मात्र, त्यावेळी नारायण राणे यांनी मी बसून बोलणाऱ्यांचं ऐकत नसतो, असं म्हणत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आक्षेपाला प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

Neelam Gorhe News
Uddhav Thackeray Uncut Speech : वंचितसोबत युती करताना काय म्हणाले उद्धव ठाकरे? संपूर्ण भाषण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणास विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. नारायण राणे यांनी भाषण सुरू असताना छगन भुजबळ उठून बाहेर निघाले. तर त्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यांना अडवलं. त्यानंतर छगन भुजबळांनी नारायण राणे यांना हात दाखवला. भुजबळांनी हात दाखवल्यानंतर राणे यांनी मला समर्थन म्हणूनच भुजबळांनी हात दाखवला.

तर दुसरीकडे टीकेचा सूर उमटत असताना नीलम गोर्हे (Neelam Gorhe) यांनी उप सभापती अध्यक्ष नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितलं. त्यावर राणे म्हणाले कि मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो. नीलम गोऱ्हे यांनी भाषण थांबवण्याचा इशारा केला. त्यावेळी राणे म्हणाले, मी नाही थांबणार, बसून सांगणा-यांचं मी ऐकत नाही'.

Neelam Gorhe News
Uddhav Thackeray : 'नरेंद्र मोदींचा माणूस आता शरद पवारांचा सल्ला घेतो, मग मी...'; उद्धव ठाकरे CM शिंदेंवर बरसले

माझे गोड शब्द कडू लागत आहे : नारायण राणे

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमात नारायण राणे म्हणाले, 'छत्रपतींच्या राज्यात मराठी माणसाला अभिमानाने वागायला शिकावं, आपण आयुष्य वेचलं त्यांची बरोबरी कुणाशी नाही. मात्र आज त्याचं तैलचित्र विधानभवनात लागतयं आनंद आहे'.

'साहेब वडिलांसारखे होते, पण मुलांसारखे कोणी नव्हतं. कोण कसं वागलं हे मला विचारा. मी जवळून पाहिलं आहे. साहेबांविरोधात त्यावेळी कुणी काही बोललं की अद्दल घडलीच समजा. आता काय कुणी काहीही बोलतं. राहुल नार्वेकर यांचा आभारी आहे. चांगलं काम केलं. मात्र काही लोकांना माझे गोड शब्द कडू लागत आहेत. त्यामुळे इथेच थांबतो, असे नारायण राणे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com