Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही; फडणवीसांचं बोम्मईंना सणसणीत उत्तर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
Devendra Fadnavis vs Basavaraj Bommai
Devendra Fadnavis vs Basavaraj BommaiSaam TV

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. सांगली (Sangali) जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांच्या दाव्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis vs Basavaraj Bommai
Maharashtra Politics : 'शिंदे-भाजप सरकार लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होतेय'

महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असं सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बसवराज बोम्मई यांना दिलं आहे. ज्या ठरावाचा उल्लेख बोम्मई यांनी केला आहे, तो ठराव 2012 साली केला होता. त्यानंतर कुणीही अशा प्रकारची मागणी केली नाही. असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'2012 साली ठराव केला होता. आता कोणत्याही गावाने कोणताही ठराव केला नाही. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही कर्नाटकशी तडजोड करून त्यांना हाव तिथं पाणी देऊन आम्हाला पाणी हवं तिथ घेऊ असा निर्णय केला होता. त्यानंतर सुधारित योजना होती. त्या नव्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय त्यावेळचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. तशी योजनाही केली होती. ती तयार झाली आहे, असं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, की 'आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत, आता कोविडमुळे मागच सरकार त्याला मान्यता देऊ शकलं नसेल. त्यामुळे आता त्याला तत्काळ मान्यता देणार आहोत आणि तिथे पाणी पोहचणार आहे. या सर्व योजनाला केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आताची कोणती मागणी नाही ही जुनी मागणी आहे. आता कोणतीही मागणी केली नाही', असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis vs Basavaraj Bommai
Vinayak Raut : बावनकुळे यांची स्मरणशक्ती कमी झाली; विनायक राऊतांचा टोला

बसवराज बोम्मई यांनी काय म्हटलं होतं?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 'सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे. या दुष्काळी गावातील कर्नाटक सीमा भागातील चाळीस गावे पाण्यापासून वंचित आहेत'.

'या गावांनी पाण्यासाठी लढा दिला अनेक बैठका झाल्या मात्र अद्यापही या गावांना पाणी मिळाले नाही. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या चाळीस गावांना पाणी देण्याचे विचार करत आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकारने गंभीरपणे विचार करीत आहे', असं खळबळजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com