
भूषण शिंदे
Devendra Fadnvis News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबई दौऱ्यावर असून आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. केजरीवाल यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
'बाळासाहेबांना विरोध करणाऱ्यांना मातोश्रीमध्ये बोलावून बटाटे वडे भरवताहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. (Latest Marathi News)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टीकास्त्र सोडलं आहे. यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस हे केजरीवाल आणि ठाकरे भेटीवर म्हणाले, ' केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांना एकमेकांची गरज लागत आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशी ही हात मिळवायला तयार आहेत. उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत'.
'त्यांनी हा प्रयोग २०१९ साली केला,तेव्हा अयशस्वी झाला. आता देखील अयशस्वी होईल. अरविंद केजरीवाल यांना ठाकरे यांच्या घराच्या चकरा मारायला लागत आहेत. यावरून स्पष्ट होते की हे किती घाबरले आहेत',अशी टीका त्यांनी केली.
फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस टीका करताना म्हणाले, ' ते कोणाचे नाते जपतात. मला माहीत नाही.पण पाच वर्ष ज्यांच्या सोबत होते, त्यांचा फोन सुद्धा उचलायचा नाही. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद करायचे. जन्मभर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा विरोध केला, त्यांना मातोश्रीमध्ये बोलावून बटाटे वडे भरवायचे'.
अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंवर भाष्य केलं. केजरीवाल म्हणाले, 'नाती जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. राजकारणापलिकडे जाऊन आम्ही नाती जपतो'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.