तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही गधाधारी; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

आज १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा होत आहे.
तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही गधाधारी; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
Devendra FadnvisSaam Tv

मुंबई: हनुमान चालिसा म्हटल्याने राजद्रोहचा गुन्हा दाखल करता, तुमचं हिंदुत्व गदाधारी नाहीतर गधाधारी असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला. आज १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा होत आहे. भाजपच्या पोलखोल सभेचा आज समारोप होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूका लक्षात घेता या सभेला महत्त्व आहे. या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. मुख्यमंत्री यांचे वर्क फ्रॉम होम माहीत होते आता वर्क फ्रॉम जेल कळाले आहे. होय आम्ही काश्मीरमध्ये मुक्ती सोबत गेलो होतो. पाकिस्तानला आम्ही सांगितले बघा आम्ही सत्ता स्थापन करू शकतो. पण त्याचवेळी पाठींबा काढून आम्ही मेहबूबा मुफ्तीला खाली खेचले. या देशात एकच वाघ तयार झाला आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी, असंही फडणवीस म्हणाले.

काही लोकांना वाटतं हा महाराष्ट्र फक्त त्यांचाच आहे. परंतु हा महाराष्ट्र १८ पगड जातींचा आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस 17 दिवस सेंट्रल जेलमध्ये होता. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. बाबरी पाडली तेव्हा आरोप कुणावर झाले तर भाजपच्या नेत्यांवर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.