फडणवीसांनी आरोप केलेल्या तथाकथित 'दाऊद'च्या माणसाकडूनच फडणवीसांचा सत्कार... (पहा Video)

Devendra Fadnavis Viral Video: या व्हिडिओत मुस्लिम वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सीर लाम्बे हे देखील फडणवीसांचा सत्कार करताना दिसत आहेत.
Devendra Fadnavis felicitated by Dawood's man? Older Video Viral ...
Devendra Fadnavis felicitated by Dawood's man? Older Video Viral ...Saam TV

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणीवस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र आता त्यांनी आरोप केलेल्या एका नेत्यानेच फडणवीसांचा (Devendra Fadnavis) सत्कार केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कॉंग्रसेने नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी याबाबतचा व्हिडिओ रिट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे. (Devendra Fadnavis felicitated by Dawood's man? Older Video Viral ...)

हे देखील पहा -

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल (सोमवारी) फडणवीसांनी आणखी एक पेनड्राईव्ह सादर केला. यावेळी त्यांनी मुस्लिम वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सीर लाम्बे (Dr. Mudassir Lambe) यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले. तर डॉ. मुदस्सीर लाम्बे यांची नियुक्ती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीच केल्याचा आरोपही फडणवीसांनी केला होता. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसत आहेत. यात अनेक मुस्लीम बांधवांकडूव फडणवीसांचा सत्कार होताना दिसत आहे. या व्हिडिओत मुस्लिम वक्फ बोर्डाचे सदस्य डॉ. मुदस्सीर लाम्बे हे देखील फडणवीसांचा सत्कार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

फडणवीसांच्या या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी "तथाकथित दाऊदशी संबंधित व्यक्तीकडून सत्कार.... शांतम् पापम्...शांतम् पापम्" असं ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे. तर मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या डॉ. सईदा खान यांनीही "चोर की दाढ़ी मे तीनका।" असं ट्विट करत केलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी ज्या डॉ. मुदस्सीर लाम्बे यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आराेप केला होता त्यांच्याकडून फडणवीसांनी सत्कार का स्विकारला, तसेच फडणवीस तेव्हा याबाबत अनभिज्ञ होते का असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com