अमृता फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्धावर फडणवीसांनी दोघांनाही दिला 'हा' सल्ला

Devendra Fadnavis On Amruta Fadnavis And Uddhav Thackeray : अर्थात् हा त्यांचा प्रश्न आहे, बाकी मी यावर जास्त काही बोलू शकत नाही.
Devendra Fadnavis Gives Advice to Her Wife Amruta Fadnavis And CM Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Gives Advice to Her Wife Amruta Fadnavis And CM Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध संपता संपत नाही. दोघेची एकमेकांना टोमणे मारणं सोडत नाही. या दोघांच्या भांडणांत मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चांगलेच वैतागले आहे. फडणवीसांनी स्वतः याबाबत कबुली दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले की, उद्धवजी (Uddhav Thackeray) टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या प्रश्नांना उत्तर देणं सोडत नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. (Devendra Fadnavis Gives Advice to Her Wife Amruta Fadnavis And CM Uddhav Thackeray About Criticism of Each Other)

हे देखील पाहा -

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यात एक साम्य आहे. "उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही." खरं तर मला असं वाटतं की, उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही. अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. अर्थात् हा त्यांचा प्रश्न आहे, बाकी मी यावर जास्त काही बोलू शकत नाही. असं म्हणत फडणवीसांनी आपल्या मनातली खरी गोष्ट बोलू दाखवली आहे.

Devendra Fadnavis Gives Advice to Her Wife Amruta Fadnavis And CM Uddhav Thackeray
तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर कुठे होतोय? सोप्या पद्धतीने शोधता येणार

अमृता फडणवीसांच्या गाण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा टोमणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीसांच्या गाण्या त्यांना टोमणा मारला होता. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ते जेव्हा मुख्य सचिव झाले तेव्हा मला आदित्यने सांगितलं की, बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. तेव्हा मला धक्का बसला. मला वाटंल आजपर्यंत एकच व्यक्ती गाते. आता कळलं बाकीचेसुद्धा गातात. असं म्हणत त्यांनी नाव नं घेता अमृता फडणवीसांना टोमणा लगावला होता. दरम्यान अमृता फडणवीस यांनीही अनेकदा ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोमणे मारले आहेत. आपल्या ट्विटमधून अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. या सगळ्या टोमणे युद्धात मात्र फडणवीसांनी आपल्या पत्नीला नको त्या गोष्टींना उत्तर न देण्याचा सल्ला दिलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनाही आपली पातळी वर ठेवावी असा खोचक टोला लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com