विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

आजची ही भेट कौटुंबीक भेट असल्याचे सांगितले जात आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीलावैदेही काणेकर

सुशांत सावंत

मुंबई - राज ठाकरे हे शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राहायला आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्या घरी सपत्नीक आले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनीही राज यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमृता फडणवीस देखील शिवतीर्थ येथे दाखल झाल्या आहेत.

हे देखील पहा -

मात्र, या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमधली बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आजची ही भेट कौटुंबीक भेट असल्याचे सांगितले जात आहे. कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला
Afghanistan; तालिबानच्या मंत्रिमंडळात 27 नव्या मंत्र्यांचा समावेश

बऱ्याच कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. फडणवीस हे पहिल्यांदाच राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. शिवाय पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com