Mumbai : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते : देवेंद्र फडणवीस

सध्या कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नसून गेली दोन वर्षे घरी न थांबता मी जनतेत मिसळतोय, सामान्य जनतेची कामे करतोय. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत.
Mumbai : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते : देवेंद्र फडणवीस
Mumbai : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते : देवेंद्र फडणवीस SaamTvNews

नवी मुंबई : मी सध्या कोणत्या पदावर आहे हे महत्त्वाचे नसून गेली दोन वर्षे घरी न थांबता मी जनतेत मिसळतोय, सामान्य जनतेची कामे करतोय. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत. त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना केले. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबईकरांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आलेल्या 'रुग्णवाहिका आणि सर्वसुविधा युक्त प्रसाधनगृह बस विधायक उपक्रम' कार्यक्रमात ते बोलत होते.

हे देखील पहा :

श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका व एपीएमसी मधील व्यापारी-माथाडी यांना टाकाऊ मधून टिकाऊ तयार करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह बस यांचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

Mumbai : मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते : देवेंद्र फडणवीस
Covid-19 : आता लहान मुलांना पण मिळणार कोरोना लस!

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री गणेश नाईक,आमदार रामेशदादा पाटील, माजी आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ.रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. दिवाळे गावातील ८० मासेविक्रेत्या महिलांना बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व्यवसाय परवाने प्राप्त झाले. प्राथमिक स्वरूपात त्यापैकी ५ मासेविक्री भगिनींना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते परवाने वाटप यावेळी करण्यात आले. माजी मंत्री गणेश नाईक यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समाजाभिमुख कामाचे आपल्या भाषणात कौतुक केले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com