Video : "मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे!" पुण्यात बॅनर्स लावत भाजपचं विठ्ठलाला साकडं...

Devendra Fadnavis Latest News : देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी भाजप कार्यकर्त्यांनी भावना आहे.
Video : "मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे!" पुण्यात बॅनर्स लावत भाजपचं विठ्ठलाला साकडं...
Devendra Fadnavis Banners In Puneज्ञानेश्वर हिंगोलीकर

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेशी आणि सरकारशी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यार आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे सरकार कोसळल्यास नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. अशातच देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना विठ्ठलाला साकडं घातलं आहे. "हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे!" अशा आशयाचे बॅनर्स पुण्यात लावण्यात आले आहेत. (Devendra Fadnavis Banners In Pune)

हे देखील पाहा -

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी भाजप कार्यकर्त्यांनी भावना आहे. यासाठीच पुण्यात भाजपने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल होत आहेत. याच पार्शवभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर येथील चौकात भाजप पदाधिकाऱ्यांकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पूजेचा मान हा देवेंद्र फडणवीस यांना मिळू दे! अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाडे केली आहे.

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. साम टीव्हीशी बोलत असताना आपण हिंदुत्वाशी फारकत घेऊ शकत नाहीत असं म्हटलं आहे. तसंच आपण शिवसेना (Shivsena) सोडली नाही आणि सोडणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis Banners In Pune
उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी; दीपाली सय्यद यांचं ट्विट

सामशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही. तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com