राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये सांगितले आहे.
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांना पत्र लिहिले आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या Gopichand padalkar जीवाला धोका असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये सांगितले आहे.

हे देखील पहा-

बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे यामधून दुखावलेले लोक गोपीचंद पडळकरांवर सातत्याने हल्ला करत आहेत, असे फडणवीस यांनी पत्रामध्ये सांगितले आहे. "लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो किंवा सत्ताधारी ज्यांच्या जिवास धोका आहे, त्याला संरक्षण दिले पाहिजे" असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या पडळकरांच्या जीवाला धोका
Monsoon: मुंबईसह कोकण, मराठवाड्यात अवकाळी पाऊस; 13 जिल्ह्यात हाय अलर्ट...(पहा व्हिडिओ)

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्राद्वारे करण्यात आली आहे. "त्यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या" अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com