पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी 'डिजिटल टेक्निक'; मास्कमध्ये मोबाईल!

(N95) मास्क मध्ये मोबाईल असेंमबल केलं आहे.
पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी 'डिजिटल टेक्निक'; मास्कमध्ये मोबाईल!
पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी 'डिजिटल टेक्निक'; मास्कमध्ये मोबाईल!गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: पोलीस भरती परीक्षेत (police recruitment test) कॉपी करण्यासाठी एका कॉपी बहदूराने नामी शकलं लढवली आहे. त्यासाठी एका कॉपी बहादूराने अक्षरशः एन नाईन्टी फाय मास्क (N95 Civid Mask) मध्ये मोबाईल असेंमबल केलं आहे. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpari Chinchwad Police Station, Pune) सतर्कतेमुळे या कॉपी बहादूराच्या प्रयत्नात खीळ लावली आहे.

हे देखील पहा-

परीक्षा केंद्रावर केलेल्या कसून तपासामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा मास्क वाला मोबाईल गॅजेट जप्त केला आहे. मात्र, मास्क चेक करत असताना कॉपी बहाद्दर पोलिसच लक्ष विचलित करुन अचानक फसार झाला आहे. पिंपरी चिंचवड शहारातील हिंजवडी (Hinjawadi, Pune) परिसरातील ब्लु रिडज स्कुल मध्ये मास्क मोबाईलचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी हा मास्क मोबाईल जप्त केला असून मास्क मोबाईल मध्ये असलेल्या सिम कार्डच्या माध्यमातून हिंजवडी पोलिस कॉपी बहादूराचा शोध घेऊन कारवाई करणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश Krusha Prakash यांनी दिली आहे. 

पोलिस भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी 'डिजिटल टेक्निक'; मास्कमध्ये मोबाईल!
बीडमध्ये पैशांचा पाऊस पाडतो सांगत युवकांना लाखो रुपयांचा गंडा!

पिंपरी चिंचवड पोलिस दलातील 720 पदांसाठी आज पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर शहारातील 444 केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येत आहे.  पिंपरी चिंचवड पोलीस दलातील या भरती साठी जवळपास 1 लाख 90 हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. जि ए सॉफ्टवेअर ही खासगी कंपनी पिंपरी चिंचवड पोलिस दलासाठी परीक्षा घेत आहे.   

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com