साकीनाका बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक- वळसे पाटील

आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साकीनाका बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक- वळसे पाटील
साकीनाका बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक- वळसे पाटीलSaam Tv

मुंबई: साकीनाका पोलीस (Sakinaka Police Station) ठाण्याच्या हद्दीमध्ये काल पहाटेच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार (Sakinaka Rape Case) करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकून तिला जखमी केल्याचा घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हदला आहे. अशातच संबंधीत आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे, सध्या पिडीतेवर उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल आणि यावेळी मदत करणा-यांचा तपास करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत''.

साकीनाका बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक- वळसे पाटील
साकीनाका बलात्कार प्रकरणाचं गुढ वाढलं; कटात दोघे सामील असल्याचा संशय

दरम्यान, महाराष्ट्रातील महिला अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराची प्रकरणे ताजी असतानाच काल मुंबई मध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईमधील साकीनाका परिसरात काल सकाळी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

सदर घटनेत महिलेच्या गुप्तांगात घालून रॉडसारखी वस्तू घालून महिलेला जखम पोहचवल्याची माहिती समोर आली होती. आरोपी मोहन चव्हान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर मोहन चव्हानचं CCTV फुटेज देखील समोर आलं आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपिला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com