Dipali Sayyad News : दीपाली सय्यद दाऊदच्या संपर्कात, माजी पीएचा पुनरुच्चार; उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

Dipali Sayyad News: भाऊसाहेब शिंदे यांनी 5 ते 7 वर्ष दीपाली सय्यद यांचे पीए म्हणून काम पाहिलं आहे.
Deepali Sayyad-Uddhav Thackeray
Deepali Sayyad-Uddhav Thackeray Saam TV

सचिन जाधव

Pune News : भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दीपाली सय्यद आणि दाऊद इब्राहिम यांच्यात फोनवरून बोलणं झाल्याचा पुनरुच्चार भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी 5 ते 7 वर्ष दीपाली सय्यद यांचे पीए म्हणून काम पाहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दिपाली सय्यद गेल्यायाने त्यांच्यावर कारवाई होत नाही, अस थेट आरोप शिंदे यांनी लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली, पण त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

Deepali Sayyad-Uddhav Thackeray
Maharashtra Politics: मोठी बातमी! माजी आमदार आशिष देशमुख यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी

उद्धव ठाकरेंवरही गंभीर आरोप

दीपाली सय्यद यांना 2019 साली विधानसभा निवडणूक मुंब्रा-कळवामधून उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांनी चार कोटी रुपयांची मागणी केली होती. आगोदर 65 लाख रुपये दिले, बाकी पैसे दिले नाही तर उमेदवारी देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

पण नंतर दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संपर्क करून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी देण्यास सागितले. त्यानंतर रात्री पक्षप्रवेश करून मुंब्रा-कळवामध्ये दीपाली सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली. आरटीजीएस माध्यमातून पैसे दिल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

Deepali Sayyad-Uddhav Thackeray
Political News : अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट? विखे-शिंदे वाद विकोपाला, राम शिंदेंची महाजनसंपर्क अभियानाला दांडी

दाऊदच्या पत्नीशी बोलणं

दाऊदच्या पत्नीमार्फत दीपाली सय्यद या दाऊदशी फोनवरून बोलल्या. उद्धव ठाकरे यांना दाऊदचा फोन आल्याने दीपाली सय्यद यांचा शिवसेना प्रवेश झाला आणि 2019 ला उमेदवारी दिली.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड संबंध आहेत. सगळे पुरावे देऊनही सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांना का पाठीशी घालत आहेत. सय्यद या पाकिस्तानलाही जाऊन आल्या आहेत. अजून एक महिना वाट बघेन आणि त्यानंतर मी कोर्टाकडे दाद मागणार आहे, असंही भाऊसाहेब शिंदे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com