INDIA Meeting Update : 'इंडिया' आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आज ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

Political News in Marathi : समितीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह १४ नेत्यांचा समावेश आहे.
India Alliance News
India Alliance NewsSaam Tv

प्रमोद जगताप

Political News :

इंडिया आघाडीच्या दोन यशस्वी बैठकांनंतर तिसरी बैठक मुंबईत पार पडली. मुंबईतील बैठकीत इंडिया आघाडीत अनेत समित्यांची स्थापना करण्यात आली. यातील समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी १३ सप्टेंबर रोजी पार पडत आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या जागावाटपाचा फॉर्म्युला आणि रणनीती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होऊ शकते. या समितीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह १४ नेत्यांचा समावेश आहे.

संध्याकाळी ४ वाजता  शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभा जागांवर भाजप उमेदवारांच्या विरोधात एकच उमेदवार उभा केला जावा, यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. (Latest Marathi News)

India Alliance News
Devendra Fadnavis : 'दुसऱ्या देशात जाऊन...'; देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

आजच्या बैठकीत काय चर्चा होऊ शकते?

लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला, विशेष अधिवेशनाची रणनीती, आगामी निवडणुका आणि लोगोबाबत बैठकीत चर्चा होऊ शकते. देशातील प्रमुख ५ शहरात रॅली काढण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

India Alliance News
Ajit Pawar News: मोठी बातमी! अजित पवार गटाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड; समोर आलं मोठं कारण...

कोण आहेत समन्वय समितीचे सदस्य?

 • शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

 • संजय राऊत (शिवसेना)

 • केसी वेणू गोपाल (काँग्रेस)

 • टीआर बालू (डी एम के)

 • तेजस्वी यादव (आरजेडी)

 • अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)

 • राघव चढा (आम आदमी पक्ष)

 • जावेद अली खान (समाजवादी पार्टी)

 • लल्लनसिंह (जेडीयू)

 • हेमंत सोरेन (जे एम एम)

 • डी राजा (सीपीआय)

 • ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स)

 • मेहबूबा मुफ्ती (पीडीपी)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com