Maharashtra Politics: राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवलं; मविआला शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक झटका

J M Abhyankar Latest News : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे अध्यक्ष पद काढण्यात आले आहे.
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News, saam tv

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Maharashtra Political News: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवले आहे. सोबतच इतर दोन सदस्यांचीही नेमणूक रद्द करण्यात आली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून तत्कालीन मविआ सरकारचा आणखी एक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदलला आहे. त्यामुळे मविआला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. (Latest Marathi News)

J M Abhyankar
J M AbhyankarSaam TV
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,
Swasthyam 2022: शरीराच्या आणि मनाच्या सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; जाणून घ्या सविस्तर...

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे अध्यक्ष पद काढण्यात आले आहे. तसेच आर. डी. शिंदे आणि किशोर मेंढे यांनाही आयोगाच्या सदस्य पदावरुन हटवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना राज्यमंत्री दर्जा होता. तसेच आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ) आणि के. आर. मेढे (सामाजिक व आर्थिक) यांनाही पदावरून हटवण्यात आलं आहे. (LIVE Marathi News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com