मंत्री पळाले तरी पत्ता नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी

राज्यातील अनेक आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना पोलीस संरक्षण असतानाही सगळी मंडळी मुंबईतून गुजरातला गेलीच कशी?
मंत्री पळाले तरी पत्ता नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी
NCP On Intelligence System, Maharashtra Political Crisis News, NCP NewsSaam TV

मुंबई : राज्यातील अनेक आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पोलीस संरक्षण असताना देखील ही सगळी मंडळी मुंबईतून गुजरातला गेलीच कशी? शिवाय गुप्तचर यंत्रणेला याचा काहीच थांगपत्ता कसा लागला नाही. शिवाय यंत्रणेत्या या हलगर्जीपणामुळे सध्याची ही वेळ ओठवल्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत गुप्तचर यंत्रणेबाबत (Intelligence System) नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(Maharashtra Political Crisis News)

तसंच या सर्व प्रकरणामुळे गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर शंकेला वाव आहे. गुप्तचर यंत्रणा ही राज्य सरकारच्या कक्षेत येते. राज्यात एवढी मोठी घडामोड होत असताना देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांना देखील कानोकान खबर कशी लागली नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (NCP News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदारांसोबत शिवसेनेचे काही राज्यमंत्री दर्जाचे नेते देखील गुजरातला गेले. त्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा देखील समावेश आहे. अशा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा असते. तरिदेखील या प्रकरणाची माहिती राज्यातील गुप्तचर विभागाला कशी मिळाली नाही. असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले आमदार विधान परिषदेच्या निकालानंतर जेवणाच्या नावाखाली हे सर्व आमदार एकत्र जमले आणि मंत्री आणि आमदार गुजरातला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या प्रकरणाची माहिती असूनही गुप्तचर यंत्रणेने गृहविभागाला का कळवलं नाही. शिवाय यंत्रणेच्या या हलगर्जीपणामुळेच ही वेळ ओढवल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, सूत्रांची माहितीनुसार गुप्तचर विभागाने आमदार नाराज आणि विरोधकांच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याना दिली होती. दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे. दरम्यान, आज आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठका सुरु आहे त्यामुळे शिंदे यांच्या बंडामुळे हे सरकार कोसळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com