दिव्यातील रस्त्याचे निकृष्ट काम तोडले

आमदार निरंजन डावखरे यांच्या सोबत आयुक्तांची भेट घेतली होती आणि कामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आज सदर रस्त्याचे निकृष्ट काम तोडण्यात आले आहे.
दिव्यातील रस्त्याचे निकृष्ट काम तोडले
दिव्यातील रस्त्याचे निकृष्ट काम तोडलेप्रदिप भणगे

प्रदिप भणगे

दिवा : दिवा - साबे रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या सोबत आयुक्तांची भेट घेतली होती आणि कामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आज सदर रस्त्याचे निकृष्ट काम तोडण्यात आले आहे.

दिवा - साबे या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर भाजपचे निलेश पाटील, आदेश भगत, अशोक पाटील, समीर चव्हाण, विजय भोईर, रोशन भगत यांनी आवाज उठवत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. बुधवारी भाजपचे आमदार निरंजन डावखरे ,उपाध्यक्ष निलेश पाटील, गटनेते मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत सुमारे 200 मीटर रस्ता खराब असल्याचे निलेश पाटील यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून देत, सदर ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.

पालिका आयुक्तांनी बुधवारी सदर निकृष्ट दर्जाचे काम तोडण्यात येईल व नवीन काम करण्याच्या सूचना देण्यात येतील असे आश्वासन भाजपच्या नेत्यांना दिले होते.त्यानुसार आज तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.भाजपने दणका दिल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.तसेच दिवा-आगसन रत्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते ते पण तोडण्यात आले.भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी याबाबत खा.शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती.आता संबधीत ठेकेदार कारवाई करणार का हे पाहवे लागेल.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com