"आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो"; समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो समोर

मालिकांच्या आरोपांवर ज्ञानदेव वानखेडे यांनी देखील समीर वानखेडे यांचे पूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
"आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो"; समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो समोर
"आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो"; समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो समोरSaam Tv

सुरज सावंत

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्या अडचणीत आणखीचं वाढत चालल्या आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी आज ट्विटच्या माध्यमातून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा नवाब मलिक करत आहेत. त्याबाबत त्यांनी अजून एक पुरावा समोर आणत कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? असा सवाल विचारला होता. तर या आरोपांवर ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede Shared Pictures Of Sameer Wankhede) यांनी देखील समीर वानखेडे यांचे पूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो असं वानखेडे कुटुंबीयांचं म्हणणे आहे.

नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर खोट्या पद्धतीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरक्षण घेऊन IRS मध्ये नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक करत आहेत. असे असताना, आता ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचे हिंदू धर्माचे पालन करत असल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आपण मुस्लिम नसून हिंदू आहोत, असं वानखेडे कुटुंबीयांचे म्हणणं आहे आणि या प्रकरणी कोर्टात खटला देखील सुरु आहे.

"आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो"; समीर वानखेडेंचे पूजेचे फोटो समोर
कबूल है,कबूल है,कबूल है, समीर दाऊद वानखडे ये तुने क्या किया? मालिकांचा सवाल

दरम्यान, आज नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखडे यांचा पहिला निकहाचा फोटो ट्विट केला आहे. त्यात वानखडे सही करताना दिसत आहेत. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आज नवाब मलिक यांच्या विरोधात न्यानदेव वानखडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. तर, वानखेडे यांनी वारंवार आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. त्यावर नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळेचे दाखले देखील काही दिवसांपूर्वी समोर आणले, ज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे धर्म हिंदू, तर काही ठिकाणी समीर दाऊद वानखेडे धर्म मुस्लीम असे दिसून आलं आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी मध्यरात्री हा बॉम्ब टाकत हा फोटो समोर आणला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com