पुण्यात भाजपला दणका; 'माऊली' बिनविराेध, काॅंग्रेसचा जल्लाेष

काॅंग्रेसच्या गाेटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
pune dcc bank dnyaneshwar dhabade
pune dcc bank dnyaneshwar dhabade

मावळ : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (pune dcc bank election) संचालकपदी पाचव्यांदा निवड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने माऊली दाभाडेंचा मार्ग सुकुर झाला. त्यामुळे पुणे (pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) निवडणुकीपुर्वीच भाजपला दणका बसल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. pune distirct cooperative bank election latest news

माऊली दाभाडे यांच्या विराेधात भाजपाच्या शैलजा दळवी, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम काजळे आणि तुकाराम भोईरकर यांनी अर्ज दाखल केले हाेते. या सर्वांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यामुळे माऊली दाभाडेंची बिनविराेध निवड मानली जात आहे. केवळ घाेषणेची आैपचारिकता बाकी आहे.

pune dcc bank dnyaneshwar dhabade
सरप्राइज : मी पुन्हा येईन म्हणणा-या युवराज सिंगचा व्हिडिओ व्हायरल

माउली हे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आहेत. यापुर्वी त्यांनी कारखान्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. आता ते पाचव्यांदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालक म्हणून जाणार असल्याने काॅंग्रेसच्या गाेटात आनंदाचे वातावरण आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com