ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांना यंदाचा 'डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार'

ज्ञानेश्वर हिंगोलीकर हे मुळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत. किर्तनकार ते टिव्ही पत्रकार असा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे.
Dnyaneshwar Hingolikar was awarded this year's Dr. Nanasaheb Parulekar Award
Dnyaneshwar Hingolikar was awarded this year's Dr. Nanasaheb Parulekar Award Saam TV

पुणे : सकाळ माध्यम समूहातील 'साम टीव्ही न्यूज'चे पुणे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. राजकीय विश्लेषक, ‘द प्रिंट‘चे संस्थापक-संपादक, पद्म भूषण शेखर गुप्ता (दिल्ली), सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांना गौरविण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा पार पडला.

Dnyaneshwar Hingolikar was awarded this year's Dr. Nanasaheb Parulekar Award
मुंबई संकटात असताना गिधाड कुठे असतात? उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर जोरदार टीका

‘सकाळ' चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वोत्तम पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला जातो. विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन किंवा वार्तांकन करणाऱ्या ‘सकाळ समूहा’तील पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना.अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो.

यंदा डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीचे १२५ वे वर्षे होते. यानिमित्ताने ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यात सत्तानाट्य घडत असताना ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी साम टीव्हीला उद्धव ठाकरे हे राज्यपालांना राजीनामा देत असतानाची EXCLUSIVE दृष्य मिळवून दिली.

Dnyaneshwar Hingolikar was awarded this year's Dr. Nanasaheb Parulekar Award
शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, ४० आमदारांवर टांगती तलवार, जयंत पाटील कडाडले

हिंगोलीकर हे मुंबई, पुण्यासह राज्यभर महत्त्वाच्या घडामोडींचे ते वार्तांकन करत असतात. सामाजिक प्रश्न लावून धरणे, शोधपत्रकारिता, परिणामकारक बातमीदारी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. साम टीव्हीतील अशाच सर्वोत्तम कामगिरीबद्दल हिंगोलीकर यांना या वर्षीचा डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार देण्यात आला.

ज्ञानेश्वर हिंगोलीकर हे मुळचे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आहेत. किर्तनकार ते टिव्ही पत्रकार असा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. विविध माध्यम समूहात त्यांनी यापूर्वी काम केले आहे. याशिवाय त्यांनी राज्य आणि देश पातळीवर शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांचे विजेतेपदही पटकावले आहे.

पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा असणारा स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार ना.अ.पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com