
पुणे : काही दिवसापूर्वी तुर्कस्तानने (Turkey) भारतीय गहू (Wheat) खराब असल्याचे सांगून परत केला. २९ मेपासून ५६,८७७ टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कीतून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. गव्हात रुबेला विषाणू (rubella virus) आढळल्याचे तुर्कीने म्हटले आहे. त्यामुळे ते परत पाठवण्यात आले आहेत. यावर आता राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.वाय.एस. नेरकर यांनी प्रतिक्रीया दिली.
रूबेला व्हायरस प्राण्यांत आढळतो, त्या व्हायरसचे संक्रमण माणसाला होऊ शकते, मात्र अजून तरी रूबेला व्हायरसच्या संसर्ग वनस्पतीला झाला अशी कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नसल्याचे मत, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वाय. एस. नेरकर यांनी व्यक्त केले आहे.
गव्हाला (Wheat) प्रामुख्याने बुरशीजन्य रोग होतात. असे रोग शेतात उभे असलेल्या पिकाला होऊ शकतात, किंवा गहू साठवणूक करताना, गव्हाला बुरशीजन्य रोग होऊ शकतात. मात्र, प्राणिमात्रांमध्ये असणारा रूबेला व्हायरसचा गहू सारख्या वनस्पती पिकाला संसर्ग झाल्याचे सध्या तरी कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. केंद्र सरकारच्या कृषी विषयक संस्थांनी याविषयी स्पष्टीकरण करायला हवे असंही डॉ. नेरकर म्हणाले.
डॉ.नरेकर म्हणाले, भारतातील शेतकऱ्यांच्यात एवढी ताकद आहे, स्वत: उत्पादन करुन निर्यात करु शकतात. भारतातून द्राक्षेही मोठ्या प्रमाणात निर्यात करु शकतो. बासमती तांदूळही आपण निर्यात केला आहे. यासाठी आता आपल्याला धोरण ठरवावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धोरण ठरवता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल.
'देशाने गहू पाठवला तो त्यांनी घेतला नाही, ते म्हणतात त्यात रुबेलाचा व्हायरस सापडला. मात्र त्यांनी तपासला की तसाच परत पाठवला आहे, हे सांगता येत नाही. त्यांच्याकडे तसा पुरावा नाही. रुबेलाचा जो त्यांनी आरोप केला आहे, ते मोठे कोडे आहे, यावर काही सांगता येत नाही, असंही डॉ. नरेकर म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.