पाण्यासाठी मनसेच्या आमदारांची नागरिकांसह एमआयडीसी कार्यालयात धडक

एमआयडीसी कार्यालयामध्ये बुधवारी सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांसह डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयात धडक दिली आणि पाण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
पाण्यासाठी मनसेच्या आमदारांची नागरिकांसह एमआयडीसी कार्यालयात धडक
पाण्यासाठी मनसेच्या आमदारांची नागरिकांसह एमआयडीसी कार्यालयात धडकप्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली - एमआयडीसी कार्यालयामध्ये बुधवारी सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांसह डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयात धडक दिली आणि पाण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली मधील सांगावं, नंदिवली, भोपर, आजदे, हेदूटणे आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. या परिसरातील नागरिक हे साध्य टँकरने पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहेत.

त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नागरिकांची हिच बाब लक्षात घेऊन मनसे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसीचे अधिकारी, केडीएमसी आधिकारी आणि नागरिकांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत धरावे वर घेतले. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, जलवाहिणीचे काम योग्य रित्या न केल्यास तर लोकांचा उद्रेक होईल.पाण्याचे प्रेशर वाढवा आणि नागरिकांना पाणी द्या.

हे देखील पहा -

तसेच मनसे आमदार यांनी एमआयडीसी मधील इतर कामांबद्दल आणि प्रशाबद्दल ही अधिकाऱ्यासोबत चर्चा केली.मनसे आमदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की एमआयडीसी मधील रस्त्याची दुरवस्था आहे, गटारांची कामे अपूर्ण - एमआयडीसी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका एकत्रित बैठक घेण्याची आवश्यकता आहे. मौजे काटई येथे दि. २८ मे रोजी जलवाहिनी फुटली आणि परिसरात झालेले  नुकसान त्याची भरभाई द्यावी. गोठेघर-दहिसर व १४ गावे प्रादेशिक पुरवठा योजना ता.कल्याण, जि.ठाणे योजनेच्या भाग-ब अंतर्गत बाळे, ना-हेन फाटा नळ जोडणी करावी.

काटई नाका ते खोणी फाटा (उजवी बाजू) रस्त्याचे काँक्रिटीकरण प्रस्ताव सादर केला आहे.सदर बैठकीला एमआयडीसी अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, हरीशचंद्र पतंगे, विजय शेलार, राजीव पाठक कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा क.डों.म.पा. , मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत, दीपिका पेडणेकर, मिलिंद म्हात्रे, मनसे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पाण्यासाठी मनसेच्या आमदारांची नागरिकांसह एमआयडीसी कार्यालयात धडक
विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणेसाठी 55 कोटींचा खर्च

आमदार राजू पाटील यांच्या सोबत आज चर्चा झाली आहे.या चर्चेच्या अनुषंगाने असा निर्णय झाला आहे की, कल्याण डोंबिवली महापालिकेचे अभियंता आणि एमआयडीसीचे अभियंता प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहणी करतील आणि पाण्याचा दाब वाढवण्यासाठी काय करता येईल ? दुर्दैवाने दोन -तीन वेळा ब्रेक डाऊन झाले होते त्यामुळे पाण्याचा दाब कमी झाला होता.

पुढच्या दोन दिवसात कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीचे अभियंते भेट देऊन पाण्याचा दाब वाढवण्याचा प्रयत्न करतील. येत्या आठ दिवसात बदलापूर-पाईपलाईन अनधिकृत वाँशिंग सेंटरवर कारवाई करून जे नळ आहेत ते देखील काढण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com