डोंबिवली: MIDCची जलवाहिनी फुटली; तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी

एमआयडीसीची मोठी जलवाहिनी आज सकाळच्या सुमारास फुटल्यामुळे पुन्हा एकदा कल्याण - शिळ रोड जलमय झालेला पाहायला मिळाला आहे.
डोंबिवली: MIDCची जलवाहिनी फुटली; तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी
डोंबिवली: MIDCची जलवाहिनी फुटली; तलावातील शेकडो मासे मृत्युमुखीप्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली : एमआयडीसीची MIDC मोठी जलवाहिनी आज सकाळच्या सुमारास फुटल्यामुळे पुन्हा एकदा कल्याण - शिळ रोड जलमय झालेला पाहायला मिळाला आहे. आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर यामुळे खिडकाळी तलावातील शेकडो मासे मरण पावले आहेत.

हे देखील पहा-

गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण शिळ रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज सकाळी देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे.

ज्याठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे त्या परिसरात अक्षरशः पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. एवढ्या प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. कल्याण शिळ मार्गावर पाणी आल्यामुळे वाहनांना त्यातूनच वाट काढावी लागली. तर इथल्या रस्त्याला नदीचेच स्वरूप आले असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना याठिकाणी धाव घ्यावी लागली.

डोंबिवली: MIDCची जलवाहिनी फुटली; तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी
Aryan Khan Case: इम्तियाज खत्रीच्या घरावर NCBचा छापा

दरम्यान वारंवार घडणाऱ्या या जलवाहिनी फुटण्याच्या घटना थांबणार तरी कधी असा  संतप्त प्रश्न स्थानिक विचारत आहेत. दुसरीकडे खिडकाळी येथे सकाळी मोठी पाण्याची फुटली असताना आता खिडकाळी गावात अजून घटना घडली आहे. पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्द आहे. याच मंदिरा लागून मोठा आणि जुना तलाव आहे. याच तलावातील शेकडो मासे काल संध्याकाळी आणि आज सकाळी मृत पावले आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com