
डोंबिवली : तुम्ही कोणत्या गटात , तुमची भूमिका स्पष्ट करा. या कारणावरून डोंबिवलीच्या दीनदयाळ रोड शिवसेना शाखेत शहर प्रमुख विवेक खामकर आणि पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. याप्रकरणी विष्णू नगर पोलिस ठाण्यात शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी खामकर यांना अटकही केलीय. (Dombivali Shivsena News)
दुसरीकडे खामकर यांनी मात्र मी शाखेत गेलो होतो. शाखा प्रमुखाला मिन सदस्य नोंदणीबाबत विचारला, माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगत खामकर यांनी या आरोपांचं खंडन केलंय. विवेक खामकर यांना तीन दिवसांपूर्वी डोंबिवली शहर प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले होते. आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
सध्या राज्यभरात शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही बाजूने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहने, भावनिक साद घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत देखील या वादाचे पडसाद उमटले आहेत. काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. (Dombivali Todays News)
या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे नुकतेच नियुक्त झालेले डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शहरांमधील शाखांमध्ये भेट देत आहेत. शुक्रवारी ते डोंबिवली पश्चिमेकडील दीन दयाल रोडवरील शिवसेना शाखेत काही कार्यकर्त्यांसह आले होते. तेव्हा शाखेत शाखा प्रमुख परेश म्हात्रे, पवन म्हात्रे हे होते. यावेळी खामकर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला.
यानंतर म्हात्रे यांनी खामकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. खामकर काल शाखेत आले त्यांनी तुम्ही कोणत्या गटात, तुमची भूमिका स्पष्ट करा असं आम्हाला विचारलं, तुम्ही सदस्य नोंदणीचे फॉर्म भरले नाहीत अस सांगत वाद घालत शिवसेना शाखेवरील नेत्यांचे फोटो असलेला बॅनर काढून टाकला, एवढेच नाही तर शाखेत असलेल्या काही महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले. असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी म्हात्रे यांच्या तक्रारीवरून विष्णू नगर पोलीस ठाण्यात विवेक खामकर यांच्याविरोधात मारहाण, शिवीगाळ, पैसे चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी खामकर यांना अटकही केली आहे. आज त्यांना कल्याण न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.