दिवसा रिक्षाचालक अन् रात्री दराेडेखाेर; म्हसोबा चौकात सात युवकांना अटक

संशयितांकडून एक रिक्षा, दोन बाईक, दोन महागडे मोबाईल जप्त केल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.
dombivali , dombivali police
dombivali , dombivali police saam tv

dombivli news : डोंबिवलीतून (dombivli) एक धक्कादायक माहिती उघडकीस आला आहे. बालगृहात सूटुन काही युवकांनी एक टोळी तयार केली आहे. ही टाेळी वाहनास कट लागला म्हणून पादचाऱ्यांना लुटत असतं. या टाेळीतील ७ जणांना पकडण्यात पाेलिसांना (police) यश आलं आहे. संबंधितांकडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केल्याने पोलिसांनी विशेष पथके तयार करत या चोरट्यांचा शोध सुरू केला. या दरम्यान काही संशयित आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत ठाकुर्ली येथील म्हसोबा चौक येथे येणार असल्याची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती.

dombivali , dombivali police
तब्बल १८ वेळा हार्दिकनं भारताचा झेंडा फडकविला साता समुद्रापार; वाचा पाटलांची कामगिरी

या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे यांनी म्हसोबा चौक येथे सापळा रचला. रात्रीच्या सुमारास सात जण या ठिकाणी संशयास्पद रित्या फिरताना या पथकाला आढळले.

पोलिसांनी तात्काळ या सर्वांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्या झडतीत पोलिसांना धारदार कोयता, चाकू, कटावणी, स्क्रु डायव्हर अशा घातक शस्त्रांसह मिरचीची पूड आणि एक नायलॉन दोरी आढळून आली. यामुळे या सर्वांना पोलिसांनी अटक करत त्यांची कसून तपासणी करताच दिवसा रिक्षाचालक म्हणून वावरत रात्री मित्राच्या मदतीने दरोडा टाकत असल्याचे स्पष्ट झाले.

dombivali , dombivali police
Saam Impact : शिक्षकांना असे आदेश काढले जाऊ नयेत याची काळजी घेतली जाईल : दीपक केसरकर (पाहा व्हिडिओ)

मागील ५ वर्षापासून म्हणजेच २०१८ पासून ही टोळी याच परिसरात सक्रीय असून एकट्या दुकट्या प्रवाशाच्या समोर रिक्षा आडवी लावत गाडीला कट लागल्याचे सांगत नुकसान भरपाई मागण्याच्या बहाण्याने चाकूचा धाक दाखवून धारदार हत्याराने वार करत त्यांना लुटत होते. तपासा दरम्यान संशयितांकडून एक रिक्षा , दोन बाईक , दोन महागडे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com