लोकशाही हरवली आहे, कुणी शोधून देता का? शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलचा बॅनर...

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका...
लोकशाही हरवली आहे, कुणी शोधून देता का? शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलचा बॅनर...
लोकशाही हरवली आहे, कुणी शोधून देता का? शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलचा बॅनर...प्रदीप भणगे

डोंबिवली - विद्यानिकेत शाळेच्या बसवर School Busडोंबिवलीकर Dombivali स्टाईलने बॅनर Banner लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून प्रशासनच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.आता या बॅनरचा फोटो व्हायरल Viral झाला असून त्यावर चर्चा होऊ लागली आहे. कोरोना काळात सगळे काही ठप्प झाले होते, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हें असली तरी प्रशासनाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. त्यांना वाटत असेल तरच सगळे ठिकठाक होईल, अन्यथा सामान्य नागरिकांना कुणी वाली नाही. म्हणूनच कोरोना काळात लोकशाही हरवली असून ती कुणी शोधून देता का? अशी टीका डोंबिवली मधील रहिवासी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी विवेक पंडित यांनी केली आहे. याबाबतचे बॅनर सुद्धा विद्यानिकेत शाळेच्या बसवर लावले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाली असून, मार्च २०२० पासून लोकशाही हरवली असल्याचे फलक त्यांनी विद्यानिकेतन शाळेच्या बसच्या मागे लावले आहेत.रस्त्यावर खड्डे पडले आहेत, त्याबाबत कुठे काही काम सुरू असेल, तर त्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर ते देखील महापालिकेच्या ऑफिस मध्ये जाऊन विचारा असे उत्तर देऊन सामान्यांना बेदखल करीत आहेत.शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे,रस्ते धड नाहीत, वीज सतत कुठे न कुठे खंडित होतच आहे. वाहतूक कोंडीवर बोलायचे कुणी? रेल्वेसेवा सगळ्यांना साठी नाही.

हे देखील पहा -

कोरोना लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ, अधिकारी ऑनफिल्ड नाहीत.कोपर उड्डाणपुलासंदर्भात देखील कुणी कॉन्ट्रैक्टर देता का कॉन्ट्रॅक्टर, असा सवाल केल्यावर यंत्रणा जागी झाली, हे सगळ्यांना माहीत आहे. पण असे किती ठिकाणी जनजागरण करायचे? आणि का? असा सवाल डोंबिवली मधील रहिवासी , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी विवेक पंडित यांनी केला आहे. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला असताना केवळ सगळे ठीक सुरू आहे, असे म्हणायचे का? आणि म्हणायचे तरी का? म्हणूनच लोकशाही हरवली आहे, असे म्हटले तर त्यात वावगे काय, असा सवाल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पंडित यांनी उपस्थित केला आहे.

लोकशाही हरवली आहे, कुणी शोधून देता का? शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलचा बॅनर...
बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने इतिहास रचला, भारतास 5 वे सुवर्णपदक

विद्यानिकेत शाळेच्या बसवर जे बॅनर लावले आहेत त्यावर काय आहे पहा.....

MISSING

हरवली आहे

नाव : लोकशाही

वयंः ७४ पूर्ण,

कधीपासून हरवली आहे ? : ५ मार्च २०२०

संभाव्य कारण : कोरोनाच्या सुरुवातीला आवश्यक असणाऱ्या अटी/नियम, " प्रशासकीय सूनबाईनी"आता शिथिल केल्या असल्यातरी,"  माझ म्हणणं, प्रत्यक्ष' ऐकून घेत नाही आणि मनमानी करते " ह्या भावनेमुळे, मानसिकता खचलेली असून, " माझ काय होणार " ह्या भीतीमुळे....

कोणाला, हीचा ' भास झाल्यास : जवळच्या, कोणत्याही लोकप्रतिनिधी कार्यालयात 'खबरद्यावी'..

शोधणारे : शाळा/कॉलेज जाऊ इच्छिणारी नातवंडे, लोकल्सने प्रवास करू इच्छिणारे मुलगे आणि सूना.. वेगवेगळी गाऱ्हाणी, ' inward' करून, ' प्रत्यक्ष कार्यवाहीची ' वाट पाहणाऱ्या लेकी आणि जावई!

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com