डोंबिवली: MIDC कंपनीतील मशिनचे पार्ट चोरून विकणारा चोरटा अटकेत

कंपनीतून चोरलेले मशिनचे पार्ट रिक्षातून वाहतूक करून नेताना चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद...
डोंबिवली: MIDC कंपनीतील मशिनचे पार्ट चोरून विकणारा चोरटा अटकेत
डोंबिवली: MIDC कंपनीतील मशिनचे पार्ट चोरून विकणारा चोरटा अटकेतप्रदीप भणगे

प्रदीप भणगे

डोंबिवली :  डोंबिवली एमआयडीसी MIDC Dombivali मधील कंपनीतील मशिनचे तांब्या पितळेचे पार्ट चोरून भंगारात विकणाऱ्या चोरट्यास मानपाडा पोलिसांनी Manpada Police Dombivali अटक केली आहे. नागेंद्रकुमार पटेल (वय 26) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने 3 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

हे देखील पहा-

साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त!

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे साडे तीन लाखांचा (3 and half Lakhs) मुद्देमाल जप्त केला आहे. कंपनीतून चोरलेले मशिनचे पार्ट रिक्षातून वाहतूक करून नेताना चोरटा सीसीटीव्ही CCTV मध्ये कैद झाला होता. त्यानुसार रिक्षाचालक देखील चोरीच्या घटनेत त्याला मिळालेला आहे का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच मशिनचे पितळचे तयार पार्टची किंमत बाजारात जास्त असते. त्यामुळे यामागे भंगार माफियांची मोठी टोळी सक्रिय तर नाही ना? अशी शक्यता असून पोलीस याबद्दल अधिक तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध तपास;

मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये डोंबिवली एमआयडीसी मधील कंपन्यांतील मशिनचे तांब्या पितळेचे काही भाग चोरीला जात आहेत अश्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. गुरुवारी (ता. 4) एमआयडीसीतील संगम डाईग कंपनीमध्ये चोरीची घटना घडली होती. याचा तपास करत असताना, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज CCTV लागले होते. त्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे, पोलीस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, दीपक गडगे, पोलीस नाईक भारत कांदळकर, प्रवीण किनरे, महादेव पवार, यलप्पा पाटील, महेंद्र मंझा यांच्या पथकाने शोध घेत रविवारी Sunday दुपारी पटेल याला अटक Arrest केली.

डोंबिवली: MIDC कंपनीतील मशिनचे पार्ट चोरून विकणारा चोरटा अटकेत
आता सिलिंडरसाठी मोजावे लागणार तब्बल 1000 रुपये; पहा सरकारची योजना?

नोकरी मिळत नसल्याने त्याने चोरी करण्यास सुरुवात;

मानपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल 3 गुन्ह्यांत त्याचा समावेश आहे अशी कबुली दिली आहे. त्याचा तपास पोलिसांनी लावला आहे. त्याच्याकडून सुमारे साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माहितीनुसार, आरोपी पटेल हा एमआयडीसीतील MIDC एका कंपनीत पूर्वी काम (Worker in MIDC Company) करत होता. मात्र काही कारणामुळे त्याचे काम हातातून गेले होते. कोरोना Corona Wave काळात तो त्याच्या गावी गेला होता. लॉकडाऊन (Unlock) उघडताच तो इकडे परतला होता. त्यानंतर नोकरी मिळत नव्हती, मग त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. सर्व माहित असल्याने, कंपनीचे पत्रे उचकटून कंपनीत आत तो शिरतं आणि मशिनचे पार्ट चोरत असे. पोलिसांनी CCTV च्या आधारे हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. तरी यामागे भंगार माफियांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मागचे खरे सूत्रधार शोधणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com