Dombivli Crime News : एकीसोबत साखरपुडा, दुसरीशी लग्न; नवरदेवाची वरात निघाली पण पोहचली भलतीकडेच!

Dombivli Crime News : सिद्धार्थ शिंदे असे अटक केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
Dombivli Crime News
Dombivli Crime NewsSaam TV

अभिजीत देशमुख

Kalyan News: एकीशी साखरपुडा करुन दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणाऱ्या डोंबिवलीतील नवरदेवाची पोलिसांनी थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवाविरोधात बलात्काराचा तर त्याच्या आई-वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी नवरदेवाला बेड्या ठोकल्या आहेत. सिद्धार्थ शिंदे असे अटक केलेल्या नवरदेवाचे नाव असून आई शांती शिंदे आणि वडील दिलीप शिंदे अशी फरार आरोपींची नावे आहेत. (Breaking Marathi News)

Dombivli Crime News
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

सहा वर्ष पूर्वी आरोपी पीडित मुलीला एका लग्नादरम्यान भेटला होता. त्यानंतर तिच्या आईवडिलांना लग्न करण्याचं आश्वासन देत आरोपीने पीडित मुलीशी घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पैशांची अडचण सांगून तिच्याकडून लाखभर रुपये देखील उकळले. (Maharashtra News)

पीडित मुलीला लग्नाचे आश्वासन देऊन गावाकडील दुसऱ्या मुलीसोबत आई शांती आणि वडील दिलीप यांनी मुलगा सिद्धार्थ याचा साखरपुडा करून मुंबईत दोन दिवसांपूर्वी त्याचे गुपचूप लग्नही लावले. याबाबतची माहिती पीडित मुलीला कळताच तिने आपल्या कुटुंबासह विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरदेव मुलगा सिद्धार्थ विरोधात अत्याचार आणि त्याच्या आई-वडिलांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Dombivli Crime News
Kalyan Crime News: गाडी पार्किंगवरुन दोन गटात तुफान राडा, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक मोहिनी कपिले, पोलीस उपनिरीक्षक दिपविजय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. नवरदेव सिद्धार्थ लग्न करून जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी पोलीस उभे होते. त्यांनी त्याची वरात थेट पोलीस ठाण्यात काढूत नवरदेवाची रवानगी पोलीस कोठडीत केली. तर पोलीस फरार आई आणि वडिलांचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com