Crime News | डोंबिवलीत चाललंय तरी काय ? कपडे ठेवण्यावरून दोन दुकानदारांमध्ये जुंपली

डोंबिवली (Dombivli) पूर्वेत रामनगर हद्दीमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दुकानदाराने आणि त्याच्या दोन मुलांनी शेजारच्या एका दुकानदाराला आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बेदम मारहाण (Fight) केली आहे.
crime news
crime news saam tv

Dombivli Crime News : डोंबिवली (Dombivli) पूर्वेत रामनगर हद्दीमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दुकानदाराने आणि त्याच्या दोन मुलांनी शेजारच्या एका दुकानदाराला आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना बेदम मारहाण (Fight) केली आहे. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याबाबत रामनगर पोलीस ठाण्यामध्ये दुकानदार आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

crime news
Enforcement Directorate : अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

मंगळवारी डोंबिवलीत शिवसेना आणि शिंदें समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच डोंबिवली स्टेशन रोडवरील एका दुकानदार आणि त्याच्या दोन महिला नातेवाईकांना शेजारच्या एका दुकानदारांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केली. सदर घटना दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या दुकानदार आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे डोंबिवलीत नेमकं चाललंय तरी काय असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

नेमकं काय घडलं ?

डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेरील रोडवरती राजेंद्र शेलार यांचे कपड्याचे आणि इतर साहित्याचे दुकान आहे. याचं दुकानाच्या बाजूला देवराज पटेल दुबरीया याचे देखील दुकान आहे. देवराज पटेल दुबरीया हे आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानाला खेटून वारंवार ठेवत होते. अनेक वेळेला विनंती करून सुद्धा देवराज यांनी सुधारणा केली नाही. काल मंगळवारी पुन्हा देवराज यांनी दुकानाला खेटून कपड्याचा पुतळा ठेवला.

दुकानदार राजेंद्र शेलार यांनी पुतळा बाजूला हटवा असे सांगितले. याचं कारणावरून देवराज दुबरिया, त्यांचे दोन मुले मयूर आणि प्रितेश यांनी शेलार , त्यांच्या पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना यांना बेदम मारहाण केली आहे. शेलार यांच्या दुकानातील छत्री व इतर वस्तू घेऊन मारहाण केली. यामध्ये स्वतः राजेंद्र शेलार पत्नी सुवर्णा आणि मेव्हणी अंजना जखमी झाल्या आहेत. तर शेलार यांच्या दुकानातील वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे.

crime news
Yavatmal : धक्कादायक ! शेती विकून मिळणाऱ्या पैशांसाठी बाप-लेकीमध्ये झाली हाणामारी

दरम्यान, सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी देवराज दुबरिया, मयूर दुबरीया आणि प्रितेश दुबरीया यांच्या विरोधात कलम ४५२,३२४,३२३,४२७,आणि ३४ प्रमाणे रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की गुन्हा दाखल केला आहे, मात्र आरोपींना अटक केली नाही आहे. मात्र याप्रकरणी साडभोर यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना अटक का केली जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.तर दुकानदार राजेंद्र शेलार यांनी आम्हाला न्याय दयावा, अशी मागणी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com