Dombivli Crime News: खळबळजनक! फ्लॅटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय?

Dombivli Crime News Update: मृत महिलेच्या अंगावरील सर्व दागिने, तसेच घरातीलही मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
Dombivli  Crime News
Dombivli Crime NewsSaamtv

अभिजित देशमुख, प्रतिनिधी...

Dombivli News: डोंबीवलीच्या घारीवली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घारीवली परिसरातील अर्जुन इंपायर इमारतीत एका फ्लॅटमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अस्पष्ट असून चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Dombivli  Crime News
Nandurbar Accident News: ST बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, परिसरात हळहळ

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबीवलीमधील (Dombivali) घारीवली परिसरात असलेल्या अर्जुन इंपायर इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये आढळला वृध्द महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनिता पाटील असे या वृध्द महिलेचे नाव आहे. अनिता पाटील या 65 वर्षे महिला एकट्याच राहत होत्या. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अनिता यांना तिच्या मुलीने फोन केला मात्र अनिता यांनी फोन उचलला नाही.

त्यामुळेच मुलीला संशय आल्याने तिने अनिता पाटील यांच्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा ठोठावला मात्र दरवाजा न उघडल्याने दुसऱ्या बाजूस असलेल्या खिडकीतून आत प्रवेश केल्यानंतर समोरच त्यांना अनिता यांचा मृतदेह दिसून आला.

Dombivli  Crime News
Raj Thackeray News: रत्नागिरीत ठाकरेंची तोफ धडाडणार! खोके, राजीनामा अन् गद्दारी.. सभेआधीच टीझरमधून विरोधकांवर हल्लाबोल

मृत महिलेच्या अंगावरील सर्व दागिने, तसेच घरातीलही मुद्देमाल लंपास झाल्याचेही त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यामुळेच चोरीच्या उद्देशानेच ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मानपाडा पोलिस (Manpada Police) या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सख्खा भाऊचं झाला पैका वरी...

दरम्यान, नाशिक मध्येही अशीच भयंकर हत्येची घटना समोर आली होती. नाशिकच्या कामटवाडे परिसरात कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com